शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांचे परवानाधारक पिस्तूल जमा करण्याचे सिंधूदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी दीपक केसरकर यांचेही परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण २५० शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी फक्त १३ जणांना शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
या 13 जणांमध्ये मंत्री दीपक केसरकर यांना सुद्धा त्यांचे परवानाधारक पिस्तूल जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.