राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी
(st employee) आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या ( Silver Oak St Protest )दिशेनं चपला भिरकावल्या तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
पोलीसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. याप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
याच प्रकरणात आज सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी 115 जणांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे. सिल्व्हर ओकवरील आंदोलनप्रकरणी येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना (mumbai police ) जारी करण्यात आले आहेत. 4 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आलं आहे.