आज विधान परिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये नाशिक, अमरावती या पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघातील पदवीधरांनी आणि शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याचा निकाल जाहीर होणार असून या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.
याच पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील म्हणाल्या की, शिक्षक, पदवीधर, वकील आणि विद्यार्थ्यांचे मी प्रश्न सोडविले होते, आमदार नसतांना मी प्रश्न सोडविले होते, त्यामुळे जनतेला विश्वास आहे विजय आपलाच होणार आहे. ही लढत जनतेची होती, जनतेची आणि महिलांचा कौल शुभांगी पाटील यांच्याच बाजूने होता, जनतेने निवडणूक हातात घेतली होती त्यामुळे शुभांगी पाटीलच विजयी होणार. असे शुभांगी पाटील म्हणाल्या.
तसेच त्या म्हणाल्या की, कोण कुणाचा वारसा सांगत होते, पण मी संघर्षाचा वारसा सांगत होते. त्यामुळे विजय नक्की शुभांगी पाटीलचाच होईल, फक्त घोषणा बाकी आहे. जनता मला भेटण्यासाठी रस्त्यावर येत होती, त्यामुळे जनतेचा विजय होणार असेही त्या म्हणाल्या.