एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे (uddhvh thackeray) यांनी पदाधिकारी कार्यकत्यांना गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन केलं आहे.
यासोबतच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांनी सांगितले की, 40 आमदारांचे बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडेल. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्यामुळे कायदेशीर लढाईत जर अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही चिन्ह देण्यात येईल. ते प्रत्येकाच्या घरोघरी कसे पोहचेल यासाठी सर्वांनी कंबर कसा. असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्वांना आवाहान केलं आहे.
11 जूलैला सर्वोच्च न्यायालयात 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान शिवसेना नेमकी कुणाची हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.