मुंबई : शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते 52 वर्षांचे होते. दुबईत त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना लटके यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.