एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली (delhi) दौऱ्यावर जाणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेच्या (shivsena) विरोधातील बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (eknath shinde ) साथ देणाऱ्या बहुसंख्य आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
शिंदे (eknath shinde )यांना गटनेतेपदी कायम ठेवणे आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती या बाबींना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे आषाढी एकादशीला शनिवारी रात्री पंढरपूरला शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.
शिंदे यांना गटनेतेपदी कायम ठेवणे आणि भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती या बाबींना विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्याचा आव्हान देणारी शिवसेनेची याचिका आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या नोटिसा यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै सुनावणी होणार आहे.