महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी चालू झाली. आठवड्यात सलग तीन दिवस घटनापीठ सुनावणी घेण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे न देता याच खंडपीठासमोर सुनावणी चालेल, असे न्यायालयाने म्हटले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ सुनावणी करत आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तीवाद केला.
आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद होणार आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत. आता याचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.