परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काल बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकलसेवेवर झाल्याचं पाहायला मिळाले. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.
आज देखील मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.