एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्यमंत्री झाल्यापासून राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे. राजकारण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत ( sanjay raut) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.
'धनुष्यबाण' हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे (uddhvh thackeray) यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे आवाहनही केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब "खोने"के लिए कुछ भी ना बचा हो तो "पाने" के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे गटाकडून आगामी काळात शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढवण्याची योजना आखली आहे.उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी की एकनाथ शिंदेंची सेना खरी, असा प्रश्न उद्भवल्यास निवडणूक आयोग शिवसेनेची ओळख असलेले 'धनुष्यबाण' हे चिन्हच काढू शकते.
ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येनं शिंदे गटात सामील झालेले असताना दुसरीकडे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंसोबत राहणार की जाणार? याविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.