शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर पक्षासमोर आता संघटना टिकवण्याचं नवं आव्हान निर्माण झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे यापार्श्वभूमीवर नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, नागपूर आणि आजुबाजूच्या परिसरात कोणीही कुठेही गेलेलं नाही, सर्व लोक जागेवर आहेत. कुणाचे कार्यकर्ते आले, गेले हे पाहण्यासाठी आम्हाला वेळ नसून, आता फक्त पक्ष आणि पक्ष हा एकच विषय आहे असं राऊत म्हणाले. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात असतील त्याचं स्वागत करायलं हवं असं संजय राऊत नागपुरात म्हणाले. मागच्या सरकारने घेतलेले निर्णय विनाकारण रद्द केले जात आहेत, विरोधाला विरोध म्हणून काम केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. मुळात हे सरकारच बेकायदेशीर असून, आणखी सरकार का अस्तित्वात आलं नाही? फक्त मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असं राऊत म्हणाले.