काश्मिरमधील (Kashmir) परिस्थिती गंभीर आहे. तब्बल 20 पोलिसांची काश्मिरमध्ये हत्या झाली आहे. याच पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केंद्राला चांगलेच खडाबोल सुनावले आहे.
संजय राऊत म्हणाले की, काश्मिरमध्ये 20 पोलिसांची हत्या होते मात्र देशाच्या गृहमंत्र्यांना त्याची पर्वा नाही, काश्मीरमधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना देशातील केंद्र सरकार सत्तेची आठ वर्ष साजरी करण्यात व्यस्त आहे. काश्मीर रक्तबंबाळ असताना सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय, असा सवाल राऊतांची केंद्राला विचारला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, 15 जूनच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार आहे. या दौऱ्याचे राजकारण होणार नाही. काश्मीर जळत आहे आणि दिल्लीतले राज्यकर्ते चित्रपट प्रमोशनमध्ये गुंग आहेत. काश्मिरी नागरिकांच्या अक्रोशाकडे केंद्र सरकारचा दुर्लक्ष करत आहे. येथे होणारा काश्मिरी पंडितांचा आक्रोश केंद्र सरकाराच्या कानामध्ये जात नाही का? असे देखिल ते म्हणाले.