संजय राऊत हे ईडी कार्यालयाच्या परिसरात पोहोचल्यानंतर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला होता. त्यांना रात्री १२ वाजता अटक करण्यात आली.राऊत यांना ED कडून सोमवारी सकाळी वैद्यकीय तपासणी करून साडे अकरा वाजता न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल.
राऊत म्हणाले, माझ्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत, खोटे पुरावे आणि खोटी कारवाई सुरु आहे. महाराष्ट्र आणि शिवसेना एवढा कमजोर नाहीये, खरी शिवसेना काय आहे हे तुम्ही पाहत आहात. महाराष्ट्र कमकूवत होतोय म्हणून तुम्ही पेढे वाटा असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटाला उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र" असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा
संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून, ईडी अधिकारी त्यांना घेऊन ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना घराबाहेर आणताच संजय राऊत यांनी आपल्या गळ्यातील भगवा शेला काढून हात उंचावून फडकावला. यावेळी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना आता ईडीकडून अटक झाल्यानंतर आता राऊत कोर्टात जामीनासाठी अर्ज देखील दाखल करु शकतात अशी माहिती कायदे तज्ञ असिम सरोदे यांनी लोकशाहीला दिली आहे.
संजय राऊत यांच्याघरी ईडीचं पथक पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. संजय राऊत यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. यामुळे आता मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री बंगल्याच्या आजुबाजूला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूने त्यांना बाहेर काढण्यात येईल अशी शक्यता आहे.
Sanjay Raut Arrested by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांना आता ईडी कार्यालयात घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली होती. सकाळपासून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले असून, भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ठिय्या आंदोलन करत आहेत.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.