राज्यात आज गुढीपाडवा सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.राजकीय नेत्यांनी आपल्या निवासस्थानी गुढ्या उभारुन जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. यातच सामनाच्या अग्रलेखात सरकारवर टीका करण्यात आली आहे.
सामनातून म्हटले आहे की, मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. मात्र, आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे.
तसेच ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाहय़ सरकारे स्थापन केली जात आहेत.असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल. असे सामनातून म्हटले आहे.