Admin
ताज्या बातम्या

Sachin Tendulkar : सचिनचा बंगला आता होणार पाच मजल्यांचा; CRZ प्राधिकरणाकडून मिळाली मंजुरी

सचिनचा बंगला आता पाच मजल्यांचा होणार असल्याची माहिती मिळते आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सचिनचा बंगला आता पाच मजल्यांचा होणार असल्याची माहिती मिळते आहे. बंगल्याचे मजले वाढविण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी देण्यात आली आहे. सागरी नियमन क्षेत्रात हा बंगला येतो.

बंगल्याच्या जागी आधी दोराब व्हिला हा बंगला होता. वांद्रे पश्चिममधील पेरी क्रॉस रोडवरील या बंगल्याच्या जागी तेंडुलकर यांनी बंगला बांधला. सहा हजार चौरस फूट जागेत तळमजला अधिक साडेतीन माळ्यांचे बांधकाम तेंडुलकर यांनी आधीपासूनच केले आहे. २००७ मध्ये त्याची मंजुरी दिली होती.

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी सांगितले की, नियमात राहूनच वाढीव बांधकाम करावे लागेल. बांधकाम करताना तयार होणारा मलबा सीआरझेड क्षेत्रात टाकता येणार नाही. 2019 मध्ये नियमात बदल होऊन 0.5  इतका वाढीव एफएसआय देण्यात आला. त्या आधारे तेंडुलकर व पत्नी डॉ. अंजली यांनी महापालिका आणि सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. 

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी