न्यायालयानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहीत पवार म्हणाले की, मविआ सरकारने प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतरही मराठा आरक्षणाचा निकाल लागला. आजच्या निकालाची जबाबदारीही निर्विवादपणे सध्या सत्तेवर असलेल्या राज्य सरकारला घेऊन स्वतः निक्रिय असल्याचं कबूल करावं लागेल.
राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर त्यांना सहकार्यच राहील मराठा आरक्षणाच्या या सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याचं वृत्त निराश करणारं आहे. असे रोहीत पवार म्हणाले.