ताज्या बातम्या

रेपो रेट 'जैसे थे'! आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा

एप्रिल महिन्यातही रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एमपीसी बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर जैसे थे ठेवण्याची घोषणा केली आहे. रेपो दर सध्या 6.50 टक्क्यांवर आहे. यामुळे मे 2022 पासून रेपो रेट सलग सहा वेळा वाढवण्यात आला होता. यानंतर एप्रिल महिन्यातही रेपो रेटमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

शक्तीकांत दास म्हणाले की, जागतिक स्तरावर अनिश्चितता असली तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. महागाईचा दर खाली आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 8 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्के, तिसऱ्या तिमाहीत सहा टक्के आणि चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. यासोबतच चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज ६.५ टक्के ठेवला आहे. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी महागाईचा अंदाज 5.1 टक्के वर्तवला आहे.

रेपो रेट म्हणजे काय?

रेपो रेट वाढणे याचा अर्थ बँकांच्या व्याजदरात वाढ होणे होय. यंदा आरबीआयनं रेपो दर जैसे थे ठेवल्याने व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही. याचा फायदा बँकेकडून घरासाठी कर्ज घेणारे, कारसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी