भूपेश बारंगे | वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक विभागामार्फत कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाला रविवारी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा कार्यक्रम होता. मात्र ऐनवेळी अवकाळी पावसाची एन्ट्री झाली अन लोकांची तारांबळ उडाली. कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांना पावसाने झोडपून काढले. ढिसाळ नियोजनामुळे संगीत मेजवानीचा धुव्वा उडाला. प्रेक्षकांनी पावसापासून वाचण्यासाठी चक्क खुर्च्यांचा आधार घेत लोक विद्यालयाच्या मैदानातुन धावपळ सुरू होते अनेकांनी खुर्च्या घेऊन पळ काढला आहे.
तीन दिवसाच्या कार्यक्रमात समारोपाच्या दिवशी सांस्कृतिक महोत्सवामध्ये प्रसिद्ध संगीतकार व गायक कैलाश खेर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुट्टीचा दिवस असल्याने वर्धेकरांनी संगीत मेजवानी म्हणून आजच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. लहान मुलांना घेवून कुटुंबासह आले होते. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
सायंकाळी सहा वाजतापासूनच प्रेक्षकांनी मैदानावर गर्दी केली होती. याच दरम्यान पावसाच्या काही सरी आल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे कार्यक्रमाला उशीर होत गेला. 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. परंतु पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. एकच गोंधळ निर्माण झाला. प्रेक्षक चक्क खुर्च्या फेकायला लागले. काहींनी पावसाच्या बचावासाठी डोक्यावर खुर्ची घेत घराकडे धाव घेतली. एवढ्यात आयोजकांनी दिलगिरी व्यक्त केली.
एक दिवस अगोदर देवळी व हिंगणघाट तालुक्यात गारपीट झाल्यावर प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती. अनेकांनी स्वतः कैलाश खेर उशिरा आल्याचे पण बोलत होते. सात वाजताच्या कार्यक्रमाला चक्क नवु वाजवले. प्रेक्षकांनी आयोजनावर रोष व्यक्त करीत कुटुंबासह घराकडे धाव घेतली.