मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. एकूण 3,००० कंत्राटी पोलीस भरती केली जाणार असल्याचे निर्णय गृह खात्याकडून घेण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटींच्या खर्चाला सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आहे.
राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर गृह विभागानं कंत्राटी भरती करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी गृहखात्याकडून 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.