महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु राज ठाकरे यांनी हा दौरा स्थगित केला आहे. यासंदर्भात स्वत: टि्वट करत माहिती दिली. अयोध्या दौरा का स्थगित केला, यावर सविस्तर पुण्यात रविवारी (Pune rally )होणाऱ्या सभेत बोलू या? असे राज यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
मनसेकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. परंतु दुसरीकडे उत्तर प्रदेशमधून राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत होता. भाजपचे खासदार बृज भूषण यांनी राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांचा अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच काही साधू संत यांनीही या दौऱ्यास विरोध आहे. बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनीही या दौऱ्यालाही विरोध केला होता.
मनसैनिकांकडून जय्यत तयारी
मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली होती. अनेक शहरांमधून अयोध्या जाण्यासाठी रेल्वेच्या बोग्यांची बुकींग करण्यात आले होते. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते जाणार होते. यामुळे आता रविवारी राज ठाकरे पुण्यात काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. कारण राज यांनी दिलेल्या टि्वटमध्ये अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांना या यावर सविस्तर बोलूच...
काय म्हणाले होते बृज भूषण सिंह
बृज भुषण शरण सिंह यांनी सांगितलं की, उत्तर भारताचे आणि महाराष्ट्राचे संबंध नेहमी चांगले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो, महाराष्ट्रातल्या लोकांचाही आम्ही सन्मान करतो मात्र राज ठाकरेंनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये भेद निर्माण केला. त्यामुळे त्यांनी माफी मागावी असं बृ भुषण सिंह म्हणाले आहेत. ते यावेळी असंही म्हणाले की, मी केलेल्या आवाहनानुसार ५ जुन रोजी अयोध्येत ५ लाख लोक आलेले असतील. या ५ लाखांचे ६ लाख होतील, मात्र एक हजार सुद्धा कमी होणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी माफी मागितली तरी, ते अयोध्येत येऊ शकणार नाही.
दरम्यान राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत हा दौरा स्थगित झाला असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही.