Raj Thackeray Live : राज्यात सध्या राज ठाकरे यांच्या सभांची मालिका सुरु आहे. मोठ्या उत्साहाने मनसेनं पुन्हा एकदा नवी हिंदुत्वादाची (Hinduism) इनिंग सुरु केली असून, त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच आज राज ठाकरे यांची बहुप्रतिक्षीत औरंगाबादची सभा (Aurangabad) सुरु झाली आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, राज्यभरातून मनसे कार्यकर्ते या सभेसाठी औरंगाबादेत दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या या सभेत ते नेमकं कुणावर निशाणा साधणार? कुणाची नक्कल करणार? भोंग्याच्या वादावर काय भुमिका घेणार? हे पाहण्यासाठी सगळेच उत्सूक होते.
मशिदीवरील भोंग्यांबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, की आतापर्यंत सहन केलं. मात्र आता 3 तारखेनंतर सहन करणार नाही. 'अभी नही तो कभी नही' असं म्हणत राज ठारकरेंनी आवाहन केलं की, जर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर डबल आवाजात त्यासमोर आम्ही हनुमान चालिसा वाजवू. विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर पर्याय नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी उतरत्या वयात त्रास दिला. फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून त्यांना त्रास दिला. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद सुरु झाला. जातीबद्दल आपुलकी प्रत्येकाला होती, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला.
शरद पवार म्हणतात की माझ्यामुळे दुही निर्माण होतेय. मात्र, शरद पवारांनी जाती-जातींमध्ये केलेल्या भेदामुळे समाजात दुही निर्माण होतेय. प्रत्येक माणसाकडे जातीमधून पाहतात. हातात पुस्तक घेतलं की लेखकाची जात पाहतात. राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तक वाचली का म्हणे...माझ्या आजोबांनी लिहीलेल्या सर्व गोष्टी तुम्ही वाचा मग कळेल असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काही संदर्भ देखील दिले आहेत. राष्ट्रवादीमुळे दुसऱ्या जातीबद्दल भेद निर्माण झाला असा घणाघात राज ठाकरेंनी केले.
राज्यातील नेते सध्या एकमेकांवर आरोप करत आहेत. आई बहिणीवरुन शिव्या देत आहेत. आपण हे सगळं हसण्यावारी घेतोय. या नेत्यांमुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आपल्या या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणाले की, शिवराय गेल्यानंतरही औरंगजेबाला भीती वाटत होती. कारण त्याच प्रेरणेवर मावळे लढत होते. आपण आज फक्त जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतोय. "बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या देशातील लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचं भूत येईल त्यादिवशी अवघं जग जिंकू" असं राज ठाकरेंनी सांगितलं.
राज्यात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगरमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. १० दिवसांतून पिण्याचे पाणी येते. परंतु आजचे जे काही प्रमुख विषय आहे, त्यावर मी बोलणार आहे. खरंतर संभाजीनगरचे मुळ नाव खडकी होते. खरंतर जो आपला इतिहास विसरतो, त्याचा भूगोल जातो.
संभाजीनगरातील आजच्या सभेनंतर या शहरातील पुढचा महापौर मनसेचा असणार आहे. आता राज्याने या माणसाच्या पाठीमागे उभा राहिले पाहिजे.
नितीन सरदेसाई यांनी यावेळी संजय राऊत यांच्यांवर कठोर टीका केली. पक्षात राहून शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करतायं. शिवसेनेने रक्त नाही तर रक्तगट बदलला आहे. त्यांचा भगवा रंग हिरवा झाला आहे.
गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज्यातील राजकारण संपुर्ण बदललं. जे मनसेला काहीच समजत नव्हते, ते मनसेला एक नंबरचा विरोधक समजू लागले. ठाण्यातील सभेनंतर विरोधकांची दिवसा तारे दिसू लागले. त्यानंतर अयोध्यात जाण्याच्या घोषणेनंतर विरोधक घाबरले. आता अख्या महाराष्ट्राचे लक्ष संभाजीनगरच्या सभेकडे लागले आहे. आज राज्याचे नाही तर संपुर्ण देश लक्ष राज ठाकरेंकडे लागले. संभाजीनगर शिवसेनेचा गड नाहीच. जर हा शिवसेनेचा गड असता तर एमआयएमचे २२ नगरसेवक आले नसते.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा असणारे संपूर्ण मैदान खचाखच भरलं. काही वेळात राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
राज ठाकरे यांच्या सभेचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला वाचता येतील.