मुंबई : राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. मात्र त्यासाठी काही अटी पोलिसांनी ठेवल्या असल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत औरंगाबादच्या या सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या सभेची मोठी चर्चा सुरु होती. मात्र पोलीस या सभेला परवानगी देणार की नाही असा सवाल निर्माण झालेला होता. अखेर आज पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे. मात्र या सभेतून कुठल्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करु नये अशी अट राज ठाकरे यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. (Raj Thackeray Auranagabad Rally)
मनसे आणि भाजपची युती (MNS-BJP Alliance) होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) यासाठी हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या हिंदुत्वादाच्या भुमिकेमुळे याबद्दल शक्यता वर्तवण्यात येत होत्या. आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं दंड थोपटले असून, त्यासाठी आता भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे.