ताज्या बातम्या

Sidhu Moosewala Murder Case : पुणे पोलिसांना मोठे यश; संशयित आरोपीला अटक

आरोपी २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला हत्येप्रकरणी (Sidhu MooseWala Murder) पुणे पोलिसांना (Pune Police) मोठे यश हाती आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात येथून अटक केली आहे. रविवारी रात्री उशिराने त्याला पुण्यातील जिन्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता संतोषला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष जाधव विरोधात पुण्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात देखील संतोष जाधवचे मुख्य संशयित मारेकरी म्हणून नाव समोर आले आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला अटक करण्यासाठी चार पथक गठीत केले होते. या पथकाने आरोपी संतोष जाधवला गुजरात येथून अटक केली आहे. त्याला पुण्यातील जिन्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता संतोषला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संतोष जाधव हा कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स विष्णू यांची संबंधित आहे. यापूर्वी देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधवला आश्रय देणारा आरोपी सौरभ ऊर्फ महाकाल कांबळे याला अटक केली आहे. सौरभ महाकाळ, संतोष जाधव अशी आरोपींचे नावे आहेत. हे दोघेही जण लॉरेन्स बिष्णोई यांच्या टोळीतील असल्याचे समजत आहे. दरम्यान, पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी