भाजपा नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. आणि लगेच खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भाजपचा भर असणार आहे.
निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार आहे. अशी माहिती मिळत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. तर मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक, स्वरदा बापट म्हणजे बापट यांची सून माजी खासदार संजय काकडे यांची नाव चर्चेत आहेत
काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय. याची चर्चा रंगली आहे.