पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार होते. पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात येणार होते. याच निमित्ताने जिल्हा सत्र न्यायालय या मेट्रो स्टेशन ठिकाणी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासोबतच एसपी कॉलेजच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.
मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभास्थळी पावसाचं पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. एसपी कॉलेज मैदानावरच्या सभास्थळाचं तळं झाल्याचं पाहायला मिळत आहे. एसपी मैदानावर पावसामुळं चिखल झाला आहे.
मुसळधार पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. याच पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. हवामान विभागाकडून पुण्याला आजही रेड अलर्ट देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.