विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे, बैठका घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून बंजारा समाजाचा समृद्ध वारसा साजरा करताना, पंतप्रधान मोदी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन देखील करणार आहेत.
मुंबई मेट्रो लाईन 3 फेज - 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. तसेच ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे विस्ताराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. बीकेसी आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान ते मेट्रोतून प्रवास करणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र प्रकल्पाची पायाभरणी देखील करणार आहेत.