रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण दरवर्षी सावन महिन्याच्या पौर्णिमेला (सावन पौर्णिमा) साजरा केला जातो. यंदा सावन पौर्णिमा 11-12 ऑगस्ट असे दोन दिवस साजरी केली जाणार आहे.
भारताप्रमाणेच परदेशातही रक्षाबंधन हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. यामिनित्तने गेल्या काही आठवड्यांपासून रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून गेला आहे. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर बाजारात वेगवेगळ्या मिठाया आल्या आहेत. यात एक वेगळी मिठाईची राखी आहे ज्याची किंमत या मिठाईची किंमत प्रतिकिलो ६ हजार रुपये आहे.
नाशिकमध्ये तर चक्क सोन्याचा मुलामा असलेली मिठाई दाखल झाली आहे. महाग असली तरी लोक या मिठाईला आवडीने खरेदी करत आहेत.