राष्ट्रवादी काँग्रेसने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कांधल जडेजा यांनी पक्षादेश झुगारत द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याची माहिती दिली आहे.
राजनाथ सिंह, किरण रिजीजू यांच्यासह कॉंग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला आणि समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांनी मतदान केले.
एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियूष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रपती पदासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्हिलचेअर संसदेत येऊन मतदानांचा हक्क बजावला आहे. प्रकृती ठीक नसल्याने मनमोहन सिंग व्हीलचेअरवरुन पोहोचले.
राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा. या मतदानासाठी पार्टीकडून व्हिप जारी केला जात नाही. गुप्त मतदान होते. यामुळे देशभरातील मतदारांनी विवेकानुसार मतदान करावे. लोकशाहीला वाचविण्यासाठी मला मतदान करा, असे यशवंत सिन्हा यांनी म्हंटले आहे.
मी केवळ राजकीय लढाई लढत नसून केंद्रीय एजन्सीविरोधात लढत आहे. राजकीय दलांमध्ये तोडफोड करण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर, पैशांचाही खेळ केला जात आ, असा आरोप सिन्हा यांनी केला.
राष्ट्रपती पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मतदान केले आहे. यानंतर अजित पवारांसह राषट्रवादीचे काही नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
कॉंग्रेस नेते नितीन राऊत 10 वाजण्यापुर्वी अर्धातास अगोदर मतदान सभागृहामध्ये कसे गेले, हे फुटेजमध्ये आले आहे. नियमांप्रमाणे रांगेत माझे नाव पहिले होते. मात्र, राऊत मध्येच घुसून मतदान केले आहे. त्यांचे मत रद्द करावे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे, असे भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी सांगितले आहे.
राष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राष्ट्रपती पदासाठी मतदानास सुरुवात झाली असून पहिले मादान करण्याचा बहुमान कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांना मिळाला. तर, धारण देशमुख व बबनराव लोणीकर यांनीही मते दिली आहेत.
भरत गोगावले यांनी 200 आकडा पार आम्ही करणार आहोत. जसा चमत्कार आतापर्यंत झाला तसाच चमत्कार आजदेखील घडून येईल, असे म्हंटले आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये एक मोठी घडामोड घडणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं द्रौपदी मुर्मू यांना मिळणार आहेत, असे मोठे विधान भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आम्ही मतदान करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, महाविकास आघाडी कायम राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यशवंत सिन्हा यांना व्यवस्थित मतदान होईल. ही कोणत्याही जातीधर्माची लढाई नाही. लोकशाहीची लढाई आहे. काॅग्रेसचे आमदार फुटणार ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
द्रौपदी मुर्मू यांना रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल : आशिष शेलार
एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. आज रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल, असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी दर्शविला आहे. सर्वपक्षीय मतदान होईल. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकिय इतिहास ठरेल. मला महाविकास आघाडीचं अस्तित्व मला दिसत नाही. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते पाहिलं. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रौपदी मुर्मू यांच्या समर्थनात मतदान होईल, असाही दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : देशाचा 15 वा राष्ट्रपती निवडणूक (Presidential election) आज होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी भाजपा नेतृत्वातील रालोआच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यात लढत होत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी संसद भवनात दोन्ही सभागृहांतील सदस्य राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतील. उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी १० वाजता ही प्रक्रिया सुरु होईल.