ताज्या बातम्या

महाराष्ट्रानंतर आता ब्रिटनमध्ये राजकीय भुकंप; PM बोरिस जॉन्सन देणार राजीनामा

40 हून अधिक मंत्र्यांनी त्यांच्याविरोधीत राजीनामे देत Boris Johnson सरकारवर विश्वास नसल्याचे सांगितले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : ब्रिटनवर (Britain) राजकीय संकट आले असून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे. 40 हून अधिक मंत्र्यांनी त्यांच्याविरोधीत राजीनामे देत सरकारवर विश्वास नसल्याचे सांगितले आहे. यानंतर बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्याचे मान्य केले आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या सरकारवरील संकटाची सुरुवात अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांच्या राजीनाम्याने झाली. दोघांनीही ५ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितले.

ऋषी सुनक यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले होते की, सरकारने योग्य पद्धतीने काम करावे अशी लोकांची अपेक्षा आहे. त्याचवेळी साजिद जाविद म्हणाले होते की, सरकार देशहितासाठी काम करत नाही. बोरिस जॉन्सन यांची माफी मागितल्यानंतर दोघांनी हा राजीनामा दिला आहे. मात्र, तरीही दोघेही सरकारमध्ये आहेत.

क्रिस पिंचर यांच्या नियुक्तीवरून बोरीस जॉन्सनविरुद्ध बंडखोरीची सुरुवात झाली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये जॉन्सन यांनी क्रिस पिंचर यांची कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे डेप्युटी व्हीप म्हणून नियुक्ती केली होती. परंतु, एका स्थानिक वृत्तपत्राने लंडजनमधील एका क्लबमध्ये क्रिस पिंचर यांनी दोन तरुणांना चुकीच्या पध्दतीने स्पर्श केला होता. याआधीही त्यांच्यावर लैगिंक अत्यांचाराचे आरोप झाले होते. या वृत्तानंतर क्रिस पिंचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, जॉन्सन यांना क्रिस पिंचर यांच्यावरील आरोपांची माहिती होती. त्यानंतरही त्यांची नियुक्ती केली.

याविरोधात पहिला ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. यानंतर दोन दिवसांत आतापर्यंत चार कॅबिनेट मंत्री, 22 मंत्री, संसदेचे 22 खाजगी सचिव आणि इतर 5 जणांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे बोरीस जॉन्सन यांना मोठा धक्का बसला असून अखेर त्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, कंझर्व्हेटीव्ह पक्ष नवीन नेता निवडेपर्यंत जॉन्सन हेच पदावर कायम राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, 2019 मध्ये प्रचंड बहुमताने बोरीस जॉन्सन सत्तेवर आले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटीव्ह पक्षाला यापूर्वी कधीही पाठिंबा नसलेल्या भागातही त्यांच्या पक्षाला प्रचंड मते मिळाली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी