एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Syed) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर त्या प्रतिक्रिया देत असतात.
दिपाली सय्यद ( Deepali Syed ) म्हणाल्या की, शिवसेनेविरोधात बंड पुकारुन मुख्यमंत्री झालेले शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये मोदींनी समेट घडवून आणावी. दोन्ही नेते मोदींचा शब्द टाळणार नाहीत अशी दिपाली सय्यद यांनी ट्विटरवरुन मागणी केलीय.
यासोबतच त्या म्हणाल्या की, “शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे,” असं दीपाली यांनी आपल्या ट्विटच्या पहिल्याच ओळीत म्हटलंय. “उद्धव (ठाकरे) व (एकनाथ) शिंदे यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षाबाहेरून नरेंद्र मोदींनी (narendra modi ) मध्यस्थी करावी,”
Aaditya Thackeray Nistha Yatra : शिवसेना पुनर्बांधनीस वेग;आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली (delhi) दौऱ्यावर जाणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्ली दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.