PM Narendra Modi in Dehu : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूतील (Dehu) महत्वपूर्वण शिळा मंदिराचं (Shila Mandir Dehu) लोकार्पण करणार आहे. "श्री विठ्ठलाय नम:" म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज आपल्या देहूमधील भाषणाला सुरुवात केली. मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या...असं म्हणून त्यांनी उपस्थितांना वंदन केलं. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या उद्घाटनाचं भाग्य देखील मला मिळालं होतं. पाच टप्प्यांमध्ये या पालखी मार्गाचं काम होईल. या मार्गामुळे अनेक भागांमध्ये प्रगतीला देखील चालना मिळणार आहे. या मार्गासाठी 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाईल असं मोदी म्हणाले. आज मी ज्या शिळा मंदिराचं उद्घाटन करतोय, ते फक्त भक्तीचं केंद्र नसून, आगामी काळातील सांस्कृती क्षेत्राचं देखील केंद्र होईल असं मोदी म्हणाले. या कार्यक्रामसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील, आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.
प्रत्येक युगात भारतात एका अवताराचा जन्म होतो. संत कबीर, संत सोपान देव, संत मुक्ताबाई अशा महान विभुतिंनी भारताना गतीशील बनवलं. संत तुकारामांना संतांच्या मंदिराचा कळस बहिणाबाई म्हटल्या आहे. संत तुकारामांनी तर मोठा संघर्ष केला. त्यांनी दुष्काळ पाहिला, मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाची संपत्तीच लोकांना दान केली. ही शिळा त्यांच्या त्याग आणि वैराग्याची निशाणी आहे. तुकारामांच्या विचारांनी पिढी घडवली. जो भंग होत नाही तोच अभंग असतो असं मोदी म्हणाले. आज देश प्रगती करतोय, त्यासाठी संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा अशा संतांमुळे आम्हाला प्रेरणा मिळते असं मोदी म्हणाले. ठजे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें, तो चि साधु ओळखावा, देव तेथें चि जाणावा" असं म्हणत मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. दलित, वंचित, मागास, आदिवासी, कामगार यांचं कल्याण देशाची प्राथमिकता आहे असं मोदी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महारांज्या जीवनात तुकाराम महाराजाचं योगदान मोठं आहे. स्वातंत्र्यांच्या लढाईत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तुरुंगात असताना हातकड्यांच्या चिपळ्या वाजवत तुकारामांचं नामस्मरण केलं. आषाढी सारख्या यांत्रांमुळेच भारत हजारो वर्षांपासून प्रगती करतोय. या परंपरा पुढे घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मोदी म्हणाले. पंढरपूर पालखी मार्गाचं आधुनिकीकरण असो, चार धाम यात्रेसाठी केलेलं काम असो, अयोध्येत देखील मंदिर तयार होतंय, काशिविश्वनाथ मंदिराला सुद्धा नवं रुप मिळालं असून, सोमनाथ मंदिराचं सुद्धा काम झालं आहे. तसंच महू हे बाबासाहेबांचं जन्मस्थळ, लंडनच्या घराचं स्मारक, मुंबईतील चैत्य भूमीचं जागा असो अशा अनेक गोष्टींची कामं झाली आहे.
देशात सुरु असलेल्या वेगवेगळ्या अभियानामध्ये देशाच्या लोकांनी भाग घेणं देखील कर्तव्य आहे. आपल्या आजुबाजूच्या तलावांना प्लास्टीक मुक्त करणं ही अध्यात्मिक गोष्ट बनली पाहिजे. देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करताना शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे. आज ज्या योगाची जगभरात धूम आहे, ती आपल्या संतांचीच देण आहे असं मोदी म्हणाले. तसंच आपल्याला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आभार मानतो असं मोदी म्हणाले. तसंच आपलं भाषण संपल्यावर त्यांनी जय जय राम कृष्ण हरी, हर हर महादेव अशा घोषणा दिल्या.