PM Narendra Modi in Raj Bhavan : आपण भारतीय लोक आपल्या समृद्ध वारश्यांबद्दल खूप उदासिन असतो, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यलढ्यासंबंधी जागरुक राहायला हवे, असेही ते म्हणाले आहेत. मुंबईतील राजभवन येथे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, एका अतिशय चांगला कार्यक्रमांसाठी आपण आज सारे एकत्र आले आहोत. स्वातंत्र्य वीरातील ही वास्तू गाथा समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे मराठी भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. राजभवन इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. जलभूषण भवन आणि क्रांतीागाथाचे उदघाटन झाले आहे. हे भवन महाराष्ट्रातील जनतेसाठी ऊर्जा देणारे ठरेल. हे राजभवन नसून लोकभवन आहे. हे जनतेसाठी आशा किरण होईल. महाराष्ट्राच्या महान परंपरेला अनुसरुन शौर्य, आस्था, अध्यात्म, स्वतंत्रता आंदोलनाचे भूमिकेचा दालनात दर्शन होते.
देश आपला स्वातंत्र्याचा 75 वे वर्ष सेलिब्रेट करत आहे. महाराष्ट्राने आजपर्यंत अनेक क्षेत्रांना प्रेरित केले आहे. महाराष्ट्रातील संतानी देशाला उर्जा दिली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे जीवन आजही राष्ट्रभक्तिची प्रेरणा देते. भारताच्या स्वातंत्र्यात अनेकांनी भूमिका निभावली आहे. स्वातंत्र्यातील अनुदान लोकल आणि ग्लोबलही होते. यामुळेच भारताकडून अनेक देशांना स्वातंत्र्यांसाठी प्रेरीत केले आहे. महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्र विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तर जेथे विकास नव्हता अशा आदिवासी जिल्ह्यातही विकासाची नवी आशा दिसून येत आहे.
लोकमान टिळक यांनी शांताप्रसाद वर्मा यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये वीर सावरकर यांना परदेशात पाठवत असून त्यांच्या शिक्षणाची आणि खाण्या-पिण्याची सोय करवी, असे सांगितले होते. शांताप्रसाद वर्मा यांचे 1930 साली निधन झाले. त्यांची अखेरची इच्छा होती की त्यांच्या अस्थि स्वतंत्र भारतात आणाव्यात. आणि तोपर्यंत सांभाळून ठेवाव्यात. परंतु, 1949 साली हे काम झाले नाही. परंतु, 2020 साली त्या अस्थिना परदेशातून भारतात आणण्याचे सौभाग्य मला लाभले. आणि मी वीराजंली यात्रा घेऊन गुजरातला घेऊन गेलो. शांताप्रसाद वर्मा यांचे जन्मगाव कच्छ मांडवीमध्ये त्यांचे लंडनसारखेच हाऊस बनविले आहे, असाही टोला पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला लगावला आहे.
दरम्यान, शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना अंदमान निकोबार येथे वीर सावरकर आणि राजभवन येथील बंकर्समधील बलिदान अशा ठ्काणी सहली काढाव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.