Rules changing from 1st August 2022 team lokshahi
ताज्या बातम्या

1 ऑगस्टपासून बदलणार अनेक नियम, खिशावर होणार थेट परिणाम; या गोष्टींमध्ये होतोय बदल

1 ऑगस्टपासून या गोष्टींमध्ये होतोय बदल

Published by : Team Lokshahi

Rules changing from 1st August 2022 : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल नियमितपणे होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. असे काही बदल सोमवार, 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत, ज्याबद्दल सामान्य माणसाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही त्या बदलांनुसार तुमची योजना बनवू शकता. यावेळी होत असलेल्या बदलांमध्ये बँकिंग ते पंतप्रधान पीक विमा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित महत्त्वपूर्ण बदलांचा समावेश आहे. (pm kisan yojana to check payment these rules will change from august)

आज ३१ जुलै ही पीएम फसल विमा योजनेची शेवटची तारीख आहे. आजपर्यंत तुम्ही या योजनेत नोंदणी केली नसेल तर येत्या १ ऑगस्टपासून तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकणार नाही. पीएम फसल विमा योजनेसाठी नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेत केवायसी करण्याची ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे. अशात, जर तुम्ही तुमची केवायसी मुदतीपूर्वी पूर्ण केली नाही, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. यापूर्वी, पीएम किसान सन्मान निधी योजनेत केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे होती, जी नंतर सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 31 जुलैपर्यंत वाढवली.

जर तुम्ही 31 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR रिटर्न भरले नाही, तर तुम्हाला 1 ऑगस्ट रोजी किंवा नंतर ITR भरण्यासाठी दंड भरावा लागेल. यामुळे तुम्हाला प्राप्तिकरातून मिळणारी काही सूटही संपुष्टात येईल. आयकर भरणाऱ्याचे उत्पन्न ५,००,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास त्याला १,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर आयकरदात्याचे उत्पन्न 5,00,000 पेक्षा जास्त असल्यास त्याला 5000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.

जर तुम्ही चेकने व्यवहार करत असाल आणि बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर १ ऑगस्टपासून तुमच्यासाठी चेक व्यवहाराची प्रणाली पूर्णपणे बदलली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच RBI च्या निर्देशांनुसार, बँक ऑफ इंडियाने आता चेकद्वारे 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्याची परवानगी दिली आहे.

'पॉझिटिव्ह पे' प्रणाली

लागू केले आहे. या नवीन प्रणालीअंतर्गत बँकेला तुम्हाला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल अॅपद्वारे द्यावी लागेल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी