E-KYC | PM Kisan Yojana team lokshahi
ताज्या बातम्या

PM Kisan Yojana e-KYC : तुम्हाला PM किसान योजनेचा 12 वा हप्ता हवा असेल तर आजच हे काम करा

पीएम किसान योजना eKYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल

Published by : Team Lokshahi

PM Kisan Yojana E-KYC : पीएम किसान योजनेसाठी केवायसी पूर्ण होण्याची तारीख जवळ आली आहे. PM किसान eKYC ची अंतिम मुदत 2 दिवसात संपणार आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच बायोमेट्रिक eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. (PM Kisan Yojana E-KYC)

तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर योजनेचा लाभ घेण्यासाठी ती लवकरात लवकर पूर्ण करा. ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 मे 2022 होती, परंतु नंतर सरकारने ती वाढवली. याशिवाय, सरकारने OTP प्रमाणीकरणावर आधारित eKYC तात्पुरते निलंबित केले आहे.

पीएम किसान योजना eKYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल

या योजनेंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षातून दर चार महिन्यांनी रु.2000 चे तीन समान हप्ते मिळतात. आतापर्यंत लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेच्या 11 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. पंतप्रधान मोदींनी मे 2022 मध्ये हा हप्ता वितरित केला होता. या योजनेचा 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशात, जेव्हा तुम्ही तुमचे eKYC सत्यापित कराल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा मदतीसाठी तुम्ही पीएम-किसान हेल्पलाइन नंबर 011-24300606,155261 वर संपर्क साधू शकता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी