ट्विटर, ॲमेझॉन नंतर आता PepsiCo कडूनही कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. शेकडो लोकांची नोकरी धोक्यात आली आहे. ट्विटर, ॲमेझॉन, मेटा नंतर पेप्सिको कंपनी नोकरकपात करणार आहे.पेप्सिको कंपनी सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबतीत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
येत्या काळात विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नोकरकपातीचं सत्र सुरु झालं आहे. अशी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे. पेप्सिको कंपनी चिप्स, क्वेकर ओट्स, डोरिटोस आणि कोल्ड ड्रिंक्स सारख्या अनेक गोष्टीचं उत्पादन करते. पेप्सिको कंपनीच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत जगभरात सुमारे 3,09,000 कर्मचारी कार्यरत आहेत.
त्यामुळे येत्या काळात पेप्सिको कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी दिग्गज टेक कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. ही कंपनी फूड इंडस्ट्रीमधील दिग्गज कंपनी आहे. पेप्सिको आपल्या कंपनीत काम करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी तंत्रज्ञान आणि मीडिया विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना काढण्याची शक्यता आहे.