पंढरपूर : विठ्ठल साखर कारखाना बैठकीत मोठा राडा झाला असून, ऊसाचं बिल मागणाऱ्या एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) स्थानिक नेत्यांसमोरच शेतकऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला आहे. विठ्ठल साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory, Pandharpur) विचार विनिमय बैठकीदरम्यान हा सर्व राडा झाला आहे.
ऊस बिल मागणाऱ्या शेतकरी जगन भोसलेला धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीच ही धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. उद्यापासून विठ्ठल कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू होतेय. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भालके गटाने ही बैठक आयोजित केली होती.