कांदा निर्यात बंदी अखेर हटवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक झाली. त्यात कांद्यावरील बंदी हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती.
आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. गुजरातसह महाराष्ट्रात कांद्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली असल्याची माहिती मिळत आहे.