सचिन बडे, छत्रपती संभाजीनगर
शिवसेना आता संपून जाईल मात्र ठाकरे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणच्या जनतेने बाजार समितीच्या निवडणुकीत नाकारला आहे ठाकरे काट्याचे सगळे इथे असताना देखील एकही बाजार समिती त्यांच्या हातात नाही ठाकरें आणि महविकस आघाडीला नाकारले यामुळे येत्या विधानसभे पर्यंत वज्रमूठ सभा टिकणार नाही.अजित दादान विचारलं पाहिजे तुम्ही कुठे आहे तुम्हाला वज्रमठ सभेत महत्त्व आहे की नाही.महाविकास आघाडीतील बेबनाव दिसत आहे.यामुळे एक दिवस महाविकस आघाडीत स्फोट होणार असल्याच भाकीत जिल्हाचे पालकमंत्री संदीपान भूमारे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वा वर्धापन दिनानिमित्त पोलीस देवगिरी मैदानावर मुख्य शासकीय ध्वजरोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्री संदीपान भूमरे, खा. इम्तियाज जलील, आ.संजय शिरसाठ, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.यावेळी खैरे ध्वजारोहण होताच निघून गेले.यावेळी ते म्हणाले घटनाभय पालकमंत्री असून त्यांचा संदेश काय एकायचा असे म्हणत ते निघून गेले. यावर बोलतांना पालकमंत्री भुमरें बोलतं होते.ते म्हणाले चंद्रकांत खैरना युती शासनाची सत्ता आली ती बघवली जात नाही.
खैरेंना लोकशाही कळलीच नाही त्यांनी लोकशाही मान्य केली पाहिजे. कोणताही पालकमंत्री असो त्याचा संदेश ऐकला पाहिजे.आमची सत्ता आल्याच हे खैरे यांना पचत नाही.त्यामुळे खैरेंवर न बोललेलं चांगलं त्यांचा वक्तव्याला त्यांच्याच पक्षात महत्त्व नाही असा टोला पालकमंत्री संदीपान भुमारे यांनी लगावला.या जिल्ह्यांना मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये वज्रमुठ दाखवून दिली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मविकास आघाडीची एक मार्केट कमटी आल्याचे दाखवून द्यावा आज पैठण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आहे ती सुद्धा महायुतीकडे येईल.
महाविकास आघाडीचे वज्रमुठ विधानसभेपर्यंत टिकणार नाही.अजित दादान विचारलं पाहिजे तुम्ही कुठे आहे तुम्हाला वज्रमठ सभेत महत्त्व आहे की नाही.महाविकास आघाडीतील दिसत आहे एक दिवस याचा स्फोट होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यामध्ये बैठक घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ही रास्त मागणी असून बैठक घेण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे असल्याच पालकमंत्रि संदिपपान भुमरे म्हणाले.