ताज्या बातम्या

'या' दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा होणार

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुणे दौऱ्यावर येणार होते. पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला.

त्यामुळे आता येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच लोकार्पण करणार आहेत यासोबतच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण होणार असल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच हवामान आणि हवामानाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग प्रणालीचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे.

सोलापुर विमानतळाचे उद्घाटन देखिल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. या प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. विविध प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

Beed : बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 100 टक्के भरले

Satara : सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ

पुणे हिट अँड रन प्रकरण; अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्याय मंडळात पोलिसांकडून अहवाल सादर

Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार मुंबई दौऱ्यावर

Sharad Pawar : आज पुण्यात शरद पवारांची सभा