अमरावतीमध्ये उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्येमुळे खळबळ निर्माण झाली आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या (Amravati) पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (राष्ट्रीय तपास यंत्रनेकडे) देण्यात आल्याचं आरती सिंह यांनी सांगितलं. अतिसंवेदनशील विषय असल्याने सावधपणे तपास केला. आह्मी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही. आतापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात अजूनही एक आरोपी आहे त्यालाही लवकरच ताब्यात घेऊ असं म्हणत त्यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेला आरोप खोटा असल्याचं आरती सिंह म्हणाल्या.
अमरावती शहरात गुन्हेगारी कमी झाली आहे. ज्यांना धमक्या दिल्या त्यांच्या लेखी तक्रार आल्या नाहीत. आह्मी त्यांच्याकडं गेलो, तरी पण त्यांनी लेखी तक्रार नोंदवली नाही. आम्ही ज्यांना धमक्या आल्यात त्यांचा तपास करीत आहोत असं आरती सिंह यांनी सांगितलं. अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांच्याकडून कोल्हे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यात आली आहे. मृतक उमेश कोल्हे यांचे भाऊ महेश व मुलगा यांच्याकडून नवणीत राणांनी घटनाक्रम जाणून घेतला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अमरावती पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप यावेळी नवणीत राणांनी केला आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग व तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकुर यांचीही याप्रकरणात चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अमरावती पोलीस व महाविकास आघाडी सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला असा गंभीर आरोप या सर्व प्रकरणी नवनीत राणांनी केल्यामुळे आता यशोमती ठाकूर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.