Maharashtra Political Crisis Team Lokshahi
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis: 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये- Supreme Court

आज 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली, आता पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Published by : Vikrant Shinde

राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड हे या घटनापीठाचे अध्यक्ष आहेत. आज सकाळी साडे दहा वाजता या सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी सुरू झाली. 23 ऑगस्ट 2022 रोजी याप्रकरणाची सुनावणी झाली होती. परंतु, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात होत्या. आता पुढील सुनावणी ही 27 सप्टेंबर रोजी होणार आहे

सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं?

  • घटनापीठासमोरची पहिली सुनावणी झाली

  • आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार

  • २७ सप्टेंबरला दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातील

  • आज कोणताही अंतरिम निर्णय झालेला नाही

  • सदस्यांच्या अपात्रतेवर २७ सप्टेंबरला १० मिनिटे सुनावणी होणार

  • २७ सप्टेंबरला थोडक्यात सुनावणी घेऊन निर्णय होणार

  • तिन्ही पक्षांनी प्रत्येकी एका पानावर आपली भूमिका मांडण्यास सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी