विधान परिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे आज विविध कार्यक्रमानिमित्त लातूर दौऱ्यावर होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना धक्के खाण्याची सवय झाली असून धक्के का बसतायेत याचा विचार त्यांनी करावा असा टोला ठाकरे यांना लगावला आहे.
आज ठाण्यात होणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या बैठकीसाठी जाण्याची मलाही उत्सुकता होती. मात्र शक्य झाल नसल्याची प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिलीय. ठाणे कल्याणच्या जागेवर बोलण उपसभापती म्हणून योग्य वाटत नाही, मात्र तिथे आमचा विजय होईल असा विश्वास देखील गोऱ्हे यांनी स्पष्ट केला आहे. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाच्या बाबतीत जे सांगितले आहे त्यावर सरकारने विचार करण्याची गरज असून समाज अजून त्याला तयार नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलय.
दरम्यान, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहांना मान्यता देण्यास नकार दिला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. हे विधिमंडळाचे अधिकार क्षेत्र आहे, असे न्यायालयाने म्हंटले आहे.