शाहरुख खानचा मुलगा आर्यन यांच्या ड्रग्ज केस प्रकरणापासून चर्चेत आलेले एनसीबीचे तत्कालीन झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात छळवणुकीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. आता या प्रकरणी आयोगाने समीर वानखडे यांना दिलासा देत तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय होती नेमकी वानखडेंची तक्रार?
आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या व्हिजिलन्स कमिटीने केला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी समीर वानखेडे आणि इतर काही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. दरम्यान, चौकशीमध्ये एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी आपला छळ केल्याची तक्रार वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली आहे. शिवाय ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडून कुटुंबाला त्रास होत असल्याचा आरोपही समीर वानखेडेंनी केला. सोबतच पुरावे गोळा करण्यासाठी आपल्या साक्षीदारांना ज्ञानेश्वर सिंह मारहाण केल्याचा आरोप सुद्धा वानखडे यांनी केला होता. या तक्रारीनंतर आता आयोगाने या प्रकरणी तपास करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय होत प्रकरण?
मागील काही महिन्यांपूर्वी शाहरुखच्या मुलाचे ड्रग्ज केस देशभरात चांगलेच गाजली होती. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्या क्रूझवर शाहरुखचा मुलगा आर्यन खानसोबत अन्य काही लोकांना अटक करण्यात आले होते. यावरून चांगलेच राजकारण त्यावेळी तापले होते. या केस वरून भाजप आणि माविआमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र, आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होते. नंतर कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आले होते. आता केवळ 14 जणांविरोधात एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे.