ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुंबई विद्यापीठाला अखेर 2 वर्षांनंतर विद्यार्थी प्रतिनिधी मिळणार आहे. निकाल पुढे ढकलण्याची स्टुडंट्स युनियनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने हस्तक्षेप याचिका करून मतमोजणी आणि निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आणि आज सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतमोजणी होणार असून आज मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत.

अभाविप आणि युवासेना यांच्याबरोबरच बहुजन विकास आघाडी आणि छात्रभारती याही संघटना रिंगणात उतरल्या आहेत. युवासेनेकडून खुल्या वर्गातून 5, तर इतर प्रवर्गातून 5 असे एकूण 10 उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी