Mumbai Police Team Lokshahi
ताज्या बातम्या

Mumbai Police : तीन गुन्ह्यांत कोट्यवधींच्या मुद्देमालासह आरोपींना अटक

3 वेगवेगळ्या गुन्ह्यात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार ते पाच जणांना बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश.

Published by : Sudhir Kakde

मुंबई |हर्षल भदाणे पाटील : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त बिपीन कुमार (CP Bipin Kumar) यांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल माहिती दिली. नवी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चांगली कामगिरी केलेल्या तीन प्रकरणांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायकसिंह भोसले आणि त्यांच्या टीमने पहिला आणि मोठा गुन्हा उघड केला आहे. त्यांनी आगळावेगळा अमली पदार्थ (Drugs Peddler) जप्त करत 2 नायजेरियन तरुणांना अटक केली आहे. 258 ग्रॅम वजनाचा 'मैक्लोन' अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल असा एकूण 26 लाख ,04,500/ रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली आहे.

बेकायदेशीर अमली पदार्थ विकणाऱ्या महिला व पुरुषाला अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सय्यद यांच्या टीमने सानपाडा, नेरुळ व खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशिर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिला व पुरुषाला अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एन. डी. पी. एस. कलम 57/ 2022 अंतर्गत 8 क आणि 20 ब अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

तसंच 82 लाख 50 हजार रुपयांची वीज चोरी 24 तासांचं प्रकरण एनआरआय सागरी पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या टिमने चांगली मेहनत घेतली. विपिन कुमार सिंग, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या नशामुक्ती अभियानाच्या अनुशंगाने डॉ. श्री जय जाधव यांच्यासह पोलीस आयुक्त, महेश पर्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), सुरेश मेगडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा), मा.श्री. विनायक वस्तु, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली 3 गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी