Mega Block | Mumbai Mega Block | Sunday Mega Block Team Lokshahi
ताज्या बातम्या

Sunday Mega Block : मुंबईत 'या' मार्गावरील सेवा रद्द, जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे आहे

पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार

Published by : Team Lokshahi

Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत आणि वाशी/नेरुळ/पनवेल ते ठाणे येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंतच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (mumbai mega block on sunday read details)

सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहे

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या वारंवारतेने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेनलाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.

मेट्रो-3 स्थानके, पॅकेज एकमध्ये 90% नागरी काम पूर्ण

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील सर्व धिम्या गाड्या बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक काळात काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1,2,3 आणि 4 वर कोणत्याही गाड्यांचे आगमन/निर्गमन होणार नाही.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी