राज्यात २ वर्षानंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन चांगलेच सतर्क झालेले आहे. एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचा मोठा साठा विमानतळावर सापडला आहे. 10 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे अंमली पदार्थ पोलिसांकडुन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये पोलिसांकडुन एकाला अटकही करण्यात आली आहे. या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 13 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक कोकेनचा समावेश आहे.
मुंबईच्या कस्टम विभागामार्फत अधिकाऱ्यांनी विमानतळावर ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी अधिकाऱ्यांकडुन सुरु आहे. या कारवाईमुळे मुंबई विमानतळावरील बंदोबस्त आणि तपासही कडक करण्यात आला आहे. गणेशोत्सवात पार्श्वभुमीवर ऐवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आढळलामुळे खळबळ उडालीय आहे.
पोटातून तब्बल 87 कोकेनच्या कॅप्सूल मिळाल्या
28 ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळवरील कस्टम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या व्यक्तीच्या पोटातून तब्बल 87 कोकेनच्या कॅप्सूल मिळाल्या. त्यांनी तीन दिवसात या कोकेनच्या कॅप्सून खाल्या होत्या, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पश्चिम आफ्रिकेतुन ही व्यक्ती आलेली होती. जिच्या कडून एक पॅक्सही जप्त करण्यात आलं आहे.