मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरूण नियुक्ती रद्द करावी या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुंबई काँग्रेसचं शिष्टमंडळ आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये कुठेही अंतर्गत मतभेद नाहीत, त्यामुळे वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर कायम ठेवावे यासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे भेटून विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासाठी मुंबई काँग्रेसचं 70 सदस्याचं शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहे. या भेटीत या चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.