Mumbai Air Quality Index decreasing 
ताज्या बातम्या

दिल्लीतील हवा 'अतिशय खराब', मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवाळीनंतरही खराबच

मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक्यूआयच्या वेबसाईटनुसार मुंबईचा एक्यूआय 152 नोंदवला गेला आहे. तर दिल्लीतील मंगळवारी सकाळचा एक्यूआय हा 289 नोंदवला गेला आहे.

Published by : Team Lokshahi

एकीकडे देशभरात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे हवेची गुणवत्ता घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये दिवाळीच्या दिवसांत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेचा दर्जा पहिल्या दिवसापासून ढासळला होता. मात्र, दिवाळीनंतरही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर दिल्लीमध्ये ही हवेची गुणवत्ता अतिशय खराब म्हणून नोंदवण्यात आली आहे. मोसमाच्या सुरुवातीलाच हवेची गुणवत्ता ढासळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

देशाची राजधानी दिल्ली सोमवारी सकाळी दाट धुक्याने झाकोळून गेले होते. या वेळी हवेची गुणवत्ता मात्र 'अत्यंत खराब' श्रेणीच्या वरच्या स्तरावर राहिल्याचे समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार दिल्लीचा वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सकाळी 9 च्या सुमारास 373 इतका होता. शहरातील 39 निरीक्षण स्थानकांपैकी 11 ठिकाणी शहरातील प्रदूषणाची पातळी 'गंभीर' अशी नोंदवण्यात आली. तर एक्यूआय 400 हून अधिक नोंद झाला होता.

वाऱ्यांमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, दिल्लीत दिवाळीनंतर प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. आनंद विहार, अशोक विहार, बवाना, जहांगीरपुरी, न्यू मोती बाग, एनएसआयटी द्वारका, पटपरगंज, पंजाबी बाग, रोहिणी, वजीरपूर आणि विवेक विहार आदी भागांत हवेची गुणवत्ता 'गंभीर' नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार दिल्लीत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यत: एक अंशने अधिक आहे. सकाळी साडेआठ वाजता सापेक्ष आर्द्रतेची पातळी 83 टक्के इतकी होती. तर शहरातील कमाल तापमान 33.2 अंशाच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक्यूआयच्या वेबसाईटनुसार मुंबईचा एक्यूआय 152 नोंदवला गेला आहे. तर दिल्लीतील मंगळवारी सकाळचा एक्यूआय हा 289 नोंदवला गेला आहे. दिवसभरात एक्यूआय हा वाढण्याची शक्यता आहे.

Rahul Kul Daund Assembly Election 2024 result : राहुल कुल विजयी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : मानखुर्द शिवाजीनगरमधून नवाब मलिकांचा पराभव; अबू आझमींचा विजय

Devendra Fadnavis Brother: महायुतीच्या बाजूने निकालाचा कल; फडणवीसांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया

Dilip Walse Patil Ambegaon Assembly Election 2024 result : दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार

Wadala Vidhansabha: वडाळा विधानसभेतून कालिदास कोळंबकर विजयी; मुंबईत भाजपचा पहिला विजय