ताज्या बातम्या

पावसाने माणिकगड पहाडातील धबधबे खळाळले; पर्यटक घेतायत निसर्गाचा आनंद

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व पर्वतराजी माणिकगड पहाडाच्या डोंगरदऱ्यात असलेले धबधबे मुसळधार पावसाने ओथंबून वाहू लागले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक हौसी पर्यटक व ट्रेकर्स ची पाऊले या स्थळी वळली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अनिल ठाकरे, चंद्रपूर

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व पर्वतराजी माणिकगड (Parvatraji Manikgad) पहाडाच्या डोंगरदऱ्यात असलेले धबधबे (Waterfall) मुसळधार पावसाने ओथंबून वाहू लागले आहे. त्यामुळे त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक हौसी पर्यटक व ट्रेकर्स ची पाऊले या स्थळी वळली आहे.

माणिकगड पहाड (Parvatraji Manikgad)हा तसा निसर्गसौंदर्याची अलौकिक देणच आहे. या परिसरातील कोरपना व जिवती तालुक्याच्या सीमावर्ती भागात अनेक पर्यटन स्थळे आहे. त्यामुळे अनेकांचा ओढा या भागात पावसाळी पर्यटनासाठी वळतो आहे.

कोरपना तालुक्यातील बोदबोदी वगळता इतर ठिकाणच्या धबधब्यावर जाण्यासाठी कुठेच पक्का रस्ता नाही. तरी मात्र दरवर्षी बरेच पर्यटक कुतूहला पोटी या ठिकाणी भेटी देत असतात. आणि तेथील निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य ही त्यांना भुरळ घालते आहे. या ठिकाणी आलेल्या अनेक पर्यटकांना येथील अनुभव हा 'डर के आगे ही जित है ! ' असा वाटतो.

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व वनविभागाने रस्ता तसेच पर्यटन विषयक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत पर्यटकांकडून व्यक्त होते. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास साधल्यास सरकारलाही चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. व या मागास भागांचा विकासही आपसूकच घडून येईल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी