नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब सादर केला. प्रत्यक्षात आयकरात सवलत देण्याची मागणी सातत्याने होत होती. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.
2023-24 च्या अर्थसंकल्पात सादर केलेला नवीन कर स्लॅब
0 ते 3 लाख 0 टक्के
3 ते 6 लाखांवर 5 टक्के
6 ते 9 लाखांवर 10 टक्के
9 ते 12 लाखांवर 15 टक्के
12 ते 15 लाखांवर 20 टक्के
15 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्के
यापूर्वी, 2020-21 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन सवलतीच्या आयकर प्रणालीची घोषणा केली होती, ज्यामध्ये कमी कर दर लागू करण्यात आले होते. नवीन प्रणाली अंतर्गत, 0-2.50 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण आयकर सूट देण्यात आली होती.